| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीने 19 वर्षाखालील विश्वचषकाचे वेळापत्रक जारी केले आहे. 13 जानेवारी रोजी सलामीचा सामना होणार आहे. गतविजेत्या भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 14 जानेवारी रोजी कोलंबोच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोलंबोशिवाय इतर पाच मैदानावर करण्यात आले आहे. 13 जानेवारी रोजी 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या रण संग्रमाला सुरुवात होणार आहे, तर 4 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर अंतिम सामना होणार आहे.
19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा हा 15 वा हंगाम आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. 19 वर्षाखालील यंदाचा 15 वा हंगाम आहे. यंदा स्पर्धा श्रीलंकामध्ये होत आहे. 17 वर्षानंतर श्रीलंकामध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा होत आहे. 2006 मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा श्रीलंकेत पार पडली होती. त्यानंतर 17 वर्षांनी आता श्रीलंकेत पुन्हा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना यजमान श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये 13 जानेवारी रोजी होणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात 14 जानेवारी रोजी पार पडणार आहे.
भारतीय संघाचे वेळापत्रक गतविजेत्या भारताच्या ग्रुपमध्ये बांगलादेश, यूएसए आणि आयर्लंड या देशांचा समावेश आहे. गतविजेत्या भारताला जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. 14 जानेवारी - भारत विरुद्ध बांगलादेश, 18 जानेवारी - भारत विरुद्ध यूएसए, 20 जानेवारी - भारत विरुद्ध आर्यरलँड यांच्यामध्ये खेळले जाणार आहेत.
19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा भारत गतविजेता आहे. भारतीय संघाने गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 189 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने 6 विकेट्सवर 195 धावा करत अंतिम सामना जिंकला. आता पुन्हा एकदा भारतीय संघ जेतेपदाच्या बचावासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, भारतीय संघ जेतेपद राखण्यास सक्षम आहे की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.