यूएईचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

| दुबई | वृत्तसंस्था |

दुसऱ्या टी20 सामन्यात यूएईने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करत क्रिकेट विश्वात मोठा चमत्कार घडवून दाखविला. टी-20 क्रिकेटमध्ये यूएईसाठी हा विजय मोठे यश म्हणून मानले जाऊ शकते कारण, आयसीसी टी20 क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर यूएई 16व्या क्रमांकावर आहे. यूएईला हा विजय अनेक वर्षे स्मरणात राहील. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 8 गडी गमावून 142 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना यूएईने अवघ्या 15.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावा करत सामना जिंकला.

यूएईकडून कर्णधार मोहम्मद वसीम आणि आसिफ खान यांनी शानदार खेळी खेळली. सलामीवीर कर्णधार वसीमने 29 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 189.66 होता. त्याचवेळी आसिफ खानने 29 चेंडूत 48* धावा केल्या. आसिफच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या वृत्त अरविंदने 21 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

फिरकीच्या जाळ्यात अडकले
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे फलंदाज यूएईच्या फिरकीसमोर अपयशी ठरले. मार्क चॅपमनने संघासाठी 46 चेंडूत 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. चॅपमनच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. याशिवाय न्यूझीलंडचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. संघाचे एकूण 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत, त्यात डेन क्लीव्हर गोल्डन डकचा बळी ठरला.
प्रथम गोलंदाजी करताना यूएईने शानदार कामगिरी झाली. अयान खानने यूएईकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. अयानने 4 षटकात केवळ 5च्या इकॉनॉमीसह 20 धावा दिल्या. याशिवाय महंमद जवादुल्लाहने 4 षटकांत 20 धावा देत अवघ्या 4 धावा देत 2 विकेट्स घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. तर अली नसीर, जहूर खान आणि मोहम्मद फराजुद्दीन यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले. न्यूझीलंड संघ यूएई विरुद्धच्या या टी20 मालिकेत त्यांच्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित खेळत आहे. नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. डेव्हन कॉन्वे. फिन ऍलन, डॅरिल मिशेल आणि ईश सोधीसारखे स्टार खेळाडू फ्रँचायझी क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत.

Exit mobile version