| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील मुर्बी गाव, सेक्टर 19 या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी भांडणाचा बहाणा करून उबेर चालकाकडून रोख रक्कम, मोबाइल आणि टॅक्सीची चावी नेल्याप्रकरणी तिघांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सिद्दिकी हे बीकेसी रा. मुंबई यांना खारघरचे भाडे आले. ते खारघरमध्ये प्रवाशाला सोडून घरी परत जात असताना लघुशंकेसाठी त्यांनी मुर्बी गाव, सेक्टर 19 येथे गाडी पार्क केली. परत गाडीकडे जाताना दुचाकीवर निघालेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबवून त्यांना दमदाटी केली. मोहम्मद यांच्याकडील मोबाइल, पंधराशे रुपये रोख रक्कम आणि गाडीची चावी हिसकावून ते निघून गेले.







