पर्यावरणपूरक गणपती आरास स्पर्धा

उदय कळस यांना सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक

| म्हसळा | वार्ताहर |

या वर्षीच्या गणेश गौरी उत्सावानिमित्त म्हसळा शहरातील गणेश गौरी सजावटीकरिता नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पक्ष आणि म्हसळा नगरपंचायत यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आणि म्हसळा नगरपंचायत यांच्या माध्यमातून स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शहरातील गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या. उदयकुमार कळस यांच्या निवासस्थानी विराजमान गणेश आरासमध्ये जागृती समीर दिवेकर, समीर दिवेकर, वैभव कळस, सुशील दिवेकर, अनिकेत येलवे आणि मित्रमंडळ यांच्या माध्यमातून शिर्डीतील द्वारकामाई मंदिराचा हुबेहूब देखावा निसर्गातील नैसर्गिक वस्तूंचा वापर करून पूर्णपणे 100 टक्के पर्यावर पूरक सादर केला. या देखाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान कडून प्रथम क्रमांक रु. 7500/- रोख, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे गौरी सजावट स्पर्धेत अमिता संजय कर्णिक यांच्या सजावटीस रोख रु. 5000/- सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दुसरा क्रमांक प्रमोद काते, तृतीय क्रमांक दिलीप पानसरे, तर गौरी सजावटीस दुसरा क्रमांक हरीश एडवी, तृतीय क्रमांक धर्मा धामणकर, उत्तेजनार्थ यशवंत पवार, मनोज म्हशीलकर, नितीन दिवेकर, ओंकार घोसाळकर यांनी पटकाविला.

विजेत्यांना प्र. नगराध्यक्ष संजय दिवेकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीर बनकर, शहर महिला अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, चंद्रकांत कापरे, भाई बोरकर, प्रदीप कदम, सरोज म्हशीलकर, नगरसेवक निकेश कोकचा, कुमारी घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांचे खा. सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षीही उदयकुमार कळस यांच्या गणपती आरास सजावट स्पर्धेत पर्यावरणपूरक झोपडीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नगरपंचायतीकडून प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.

Exit mobile version