मुमूर्शी बौद्धवाडीचा शिंदे सेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

। महाड । वार्ताहर ।

महाड विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रामस्थ महिला, तरुण मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असून विजयाची नांदी वाजू लागली आहे. सत्तेची मस्ती जनता उतरवणार त्याची सुरूवात म्हणजे मुमूर्शी बौद्धवाडीचा प्रवेश असल्याची प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी या पक्ष प्रवेशाप्रसंगी दिली.

हा प्रवेश म्हणजे या विभागात परिवर्तनाची नांदी असल्याचे मत श्रीधर सकपाळ यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ शिवसैनिक परशुराम अण्णा बेल, महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, जिल्हा सह समन्व्यक सोमनाथ ओझर्डे, तालुका युवासेना अधिकारी प्रफुल धोंडगे, तुकारामबुवा खेडेकर, विभाग प्रमुख सचिन पवार, उपतालुका युवा सेना अधिकारी महेंद्र जोगळे, नजीर कावळेकर, मधुकर आंग्रे, अरुण आंग्रे, युसूफ पोशीळकर, एकनाथ पार्टे, इम्रान कोंडेकर, सलीम कोंडेकर, सुभाष पवार, सूर्यकांत उतेकर, बबन भालेकर, नितेश जंगम, साहिल पवार यांच्या उपस्थिती मध्ये मुमूर्शी बौद्धवाडीमधील मुंबई मंडळ अध्यक्ष भागुराम सकपाळ, सेक्रेटरी सिद्धार्थ सकपाळ, संदीप सकपाळ, कैलास सकपाळ, अरुण सकपाळ, जनार्दन धोत्रे, दुर्वेन धोत्रे, महेंद्र सकपाळ, दिलीप सकपाळ, गणेश सकपाळ, अविनाश सकपाळ, नवीन सकपाळ, वैभव सकपाळ, विनोद सकपाळ, रणजित सकपाळ, सुदाम सकपाळ आदींनी पक्ष प्रवेश करत स्नेहल जगताप याच्या पाठीशी आपण ठाम उभे राहणार असल्याचे ग्वाही देत येणार्‍या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले.

Exit mobile version