रखडलेल्या युजीसी नेट परिक्षेच्या तारखा जाहीर

। पुणे । वृत्तसंस्था ।
एनटीएमार्फत वर्षातून दोन वेळा यूजीसी नेटचे आयोजन जाते. मात्र, कोरोनामुळे डिसेंबर २०२१ व जून २०२२ मध्येही परीक्षा होऊ शकली नाही. विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (यूजीसी नेट) परीक्षेचे वेळापत्रक तारखा जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ८, ९, ११ आणि १२ जुलै, तसेच १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) नेट परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे. २०२१ व २०२२ मध्ये होऊ न शकलेल्या परीक्षा आता होणार आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेण्याचे यूजीसीने जाहीर केले होते. त्यानुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Exit mobile version