उलवे शहर अतिक्रमणाच्या गर्तेत

| उरण | प्रतिनिधी |

उलवे शहर हे भविष्यात पंचतारांकित शहर म्हणून विकसित होणार आहे. परंतु, ते सध्या अतिक्रमणाच्या गर्तेत अडकले आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाली असून भाजीपाला, वडापाव, चहाच्या टपऱ्या, हातगाड्या, चप्पल दुकाने, चिकन मटनची दुकाने अनधिकृतपणे थाटली आहेत. तसेच, शहरात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे, त्यामुळे स्थानिक जनतेला अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. या सर्वांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, त्यामुळे येथील स्थानिक जनतेमध्ये नाराजी पसरत आहे. उलवे शहर अतिक्रमण मुक्त व्हावे अशी अपेक्षा स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे. शहरात जागतिक विमानतळ, रेल्वे, मेट्रो आणि जलमार्गाने मुंबईला जोडणारा अटळ सेतू पासून सुरू होणारी नवी मुंबईतील उलवे शहर भविष्यातील सर्व सुखसोयींनी युक्त असेल, परंतु सध्याची अतिक्रमणाची समस्या दूर करणे आवश्यक आहे.त्यामुळे उलवे मधील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या हटवावेत अशी मागणी जनतेने केली आहे.

Exit mobile version