। उरण । वार्ताहर ।
गुढीपाडवा मुहूर्ताचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने कडूलिंबाचे रोपण करण्यात आले. उलवे शहर परिसरात कडुलिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प वटवृक्ष सामाजिक संस्थेने केला आहे. त्याची लागवड करुन संस्थेने गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, धनंजय तांबे, मनोहर चवरकर, संदेश साळुंखे, शिवदास कोळी, संतोष शिंदे, गणेश मढवी, प्रतिश पाटील, अनिल कांबळे, सचिन पाटील, शांताराम ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.