प्लास्टिक छप्पर गेले छत्र्या आल्या

नेरळ ग्रामपंचायतीची कारवाई दिखाऊपणा

| नेरळ । वार्ताहर ।

नेरळ ग्रामपंचायतमधील बाजारपेठेत रस्त्यावर बांधण्यात आलेला फुटपाथ फेरीवाल्यांनी अडवला आहे. त्यात या फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यासाठी टाकलेले प्लास्टिक आच्छादन दोन दिवसांपूर्वी नेरळ ग्रामपंचायत कडून काढली होती. मात्र त्यानंतर तत्काळ या फेरीवाल्यांनी प्लास्टिक आच्छादन काढल्यानंतर तेथे छत्र्यांच्या वापर सुरू केला आहे. तर काही फेरीवाल्यांनी मांडलेली लोखंडी मांडणी अजूनही तशाच आहेत, त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली कारवाई दिखाऊ पणाची होती असा आरोप आता होऊ लागला आहे.

16 नोव्हेंबर रोजी नेरळ ग्रामपंचायतकडून फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे फेरीवाले यांनी टाकलेली प्लास्टिक आच्छादन बाजूला काढण्याची कारवाई केली होती. त्यावेळी सर्व फेरीवाले यांना नेरळ ग्रामपंचायतकडून कोणत्याही स्वरूपात रस्त्यावर बसून व्यवसाय करावा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करून व्यवसाय करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असे जाहीर आदेश दिले होते. मात्र अवघ्या दोनच दिवसात नेरळ बाजारपेठ भागातील व्यवसाय करणारे फेरीवाले यांनी फुटपाथ वर लावलेले प्लास्टिक ऐवजी तेथे छत्र्या उभारून व्यवसाय सुरू केले आहेत.

नेरळ बाजारपेठ मध्ये आता फुटपाथ वर छत्र्याच छत्र्या दिसून येत असून त्यातील अनेक छत्र्या या तर रस्त्यावर आल्या आहेत. त्याचवेळी नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यावर फुटपाथ वर लोखंडी खाटा आणि कपाटे यांच्या साहाय्याने दुकाने थाटली आहेत. त्यामुळे नेरळ बाजारपेठ रस्त्यावर होणारी अतिक्रमणे दूर करताना नेरळ ग्रामपंचायत करीत असलेली कारवाई हा दिखाऊपणा आहे असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतच्या कारवाई बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version