पंच या भूमिकेकडे करिअर म्हणून बघावे – प्रसाद भोईर

। गडब । वार्ताहर ।

कबड्डी खेळाला महत्त्व प्राप्त होत असून, या खेळातील पंच हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंच या भूमिकेकडे करिअर म्हणून बघणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर यांनी गडब येथे केले.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या रायगड जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन गडब येथील जनता हायस्कूल गडब येथे करण्यात आले होते. पंच परीक्षेत सहभागी होणार्‍या उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, काराव-गडब सरपंच अर्पणा कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच तुलशिदास कोठेकर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन मोकल, सहकार्यवाह रमेश म्हात्रे, सदस्य उल्हास पाटील, रायगडा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख जनार्दन पाटील, पंच मंडळाचे सदस्य के.जी. म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, ऋणाली मोकल, अमित दळवी, राष्ट्रीय कबड्डी पंच प्रदीप मोकल, जितेंद्र कोठेकर, दिनेश पाटील, पद्माकर पाटील आदींसह परीक्षार्थी उपस्थित होते.

यावेळी गजानन मोकल, रमेश म्हात्रे, जनार्दन पाटील, के.जी. म्हात्रे, प्रदीप मोकल यांनी परीक्षार्थींना कबड्डीच्या नियमांविषयी मार्गदर्शन केले.

Exit mobile version