। गडब । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन, जिल्हा क्रीडाधकारी कार्यालय यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी पंच शिबीर शनिवार 13 ऑगस्ट सकाळी 11 वाजता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा क्रिडा अधिकारी रंविद्र नाईक, राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख विश्वास मोरे, राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह रंविद्र देसाई,राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष जे. जे. पाटील ,रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत कबड्डी खेळांचे बदलेले सुधारीत नियम व प्रात्याक्षिक यांची माहिती या शिबिरात देण्यात येणार आसुन या शिबिराला कबड्डी पंचानी उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख जनार्दन पाटील यांनी केले आहे.