• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उमटे धरणाला मिळणार नवसंजीवनी

Santosh Raul by Santosh Raul
May 30, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
0
SHARES
393
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक यांचा पुढाकार

। अलिबाग । प्रतिनिधी ।
गाळात रुतलेल्या उमटे धरणाला शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उमटे धरण संघर्ष ग्रुप यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे. गेल्या तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या गाळ काढणीला चांगला प्रतिसाद मिळत असून, हजारो ब्रास माती या धरणातून काढण्यात यश आले आहे. त्यामुळे भविष्यात मार्चनंतर उद्भवणारा पाण्याचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमटे धरण 40 हजारांहून अधिक नागरिकांसाठी जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुडकोलीपासून वेश्‍वीपर्यंतच्या 12 ग्रामपंचायत हद्दीतील 47 गावे, 30 हून अधिक वाड्यांना या पाण्याचा आधार आहे. एकेकाळी संपूर्ण शहरालादेखील या धरणातूनच पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, धरणातील गाळ काढण्यात प्रशासन उदासीन ठरले. त्याचा परिणाम या धरणात माती अधिक आणि पाणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. जानेवारीपासून हजारो नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली. चित्रलेखा पाटील यांच्या संस्थेमार्फत धरणातील गाळ काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली. 17 मे रोजी परवानगी मिळाली आणि त्याच दिवसापासून गाळ काढण्यास सुरुवात केली.

कामाची जबाबदारी चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ (चिऊताई) आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी घेतली. गेल्या तेरा दिवसांपासून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सामाजिक बांधिलकी जपत ट्रक, पोकलेन, जेसीबीसारखी यंत्र सामुग्री वापरून धरणातील गाळ काढण्यात आला आहे. शेकडो एकर असलेल्या या जागेतून गाळ काढणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. तरीदेखील जनतेच्या हितासाठी सुडकोलीपासून ते रेवदंडापर्यंत हजारो नागरिकांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे यासाठी चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांनी जबाबदारी घेतली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटना व नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

स्थानिकांना मिळणार मुबलक पाणी- आ. जयंत पाटील
उमटे धरणामध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढण्याची मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात आली आहे. या मागणीनुसार माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सीएफटीआयच्या चित्रलेखा पाटील, संघर्ष समितीचे अ‍ॅड. राकेश पाटील आणि उमटे धरण संघर्ष गु्रप यांच्या पुढाकाराने धरणातील गाळ काढण्याचे काम गेल्या तेरा दिवसांपासून सुरु झाले आहे. गाळ काढण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. तरीदेखील दहा ते तेरा दिवसांत मोठ्या प्रमाणात धरणाचा गाळ काढण्यात यश आले आहे. प्रशांत नाईक यांच्यासह चित्रलेखा पाटील यांचेदेखील योगदान मोलाचे ठरले आहे. पावसाळा सुुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या कालावधीत गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. पुढच्या कालावधीत जास्तीत जास्त गाळ काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न कायमचा सुटणार आहे. चांगल्या प्रकारचे काम टीमने केले आहे. धरणामधील गाळ पाणी असतानादेखील काढण्याचा प्रयत्न पुढे राहणार आहे. त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. नागाव, आक्षी, रेवदंडा या परिसरात बागायतदार आहेत. त्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. काम न करता बिल काढण्याची प्रथा आहे. ती मोडीत काढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.

उमटे धरणाला गुरूवारी सायंकाळी आ. जयंत पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील, सतीश लोंढे, विक्रांत वार्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निखील मयेकर, अमित नारे, रवी थोरात, सुधीर पाटील, संजय पाटील, मधुकर ढेबे, उत्तम रसाळ, दिनेश रसाळ, जयवंत तांबडकर, मोहन धुमाळ, भालचंद्र ठाकूर, निनाद वारगे, देवीदास थळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चिंचोटी, बेलोशी, उमटे, रामराज आदी परिसरात ग्रामस्थ, सीएफटीआयची टीम उपस्थित होती.

तटकरे, दळवींचा दिखावा ठरला अपयशी
अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांनी उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा केला होता. जलसंपदा विभागाकडून साधन सामुग्री मिळवून त्यामार्फत गाळ काढण्याचा उदघाटन सोहळा थाटामाटात केला होता. साधन सामुग्रीला लागणारा इंधनाचा खर्च जिल्हा परिषदेमधून घेण्यात आला. त्यासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे काम केले. त्यानंतर हे काम बंद पडले. त्यानंतर याकडे परत ही मंडळी फिरकलीच नाही. त्यांचा हा दिखावा अपयशी ठरल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात चालत जाणे कठीण असतानादेखील चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक त्याठिकाणी नियमित जाऊन पाहणी करीत आहेत. तेथील समस्या जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे काम शासन व प्रशासनाने केले पाहिजे, ते काम सामाजिक बांधिलकीतून होत असतानादेखील त्यांचे कौतुक होत असताना दिसून येत नाही, ही मोठी शोकांतिक आहे. चित्रलेखा पाटील आणि प्रशांत नाईक यांच्यामुळे या धरणाला नवसंजीवनी मिळणार आहे.

अ‍ॅड. राकेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप सदस्य

उमटे धरणामध्ये मोेठ्या प्रमाणात गाळ साचला होता. सरकार व प्रशासनाने गाळ काढण्याची जबाबदारी घेणे आवश्यक होते. मात्र, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि शेकापच्या चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या हितासाठी गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांचे काम खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यांच्यामुळे उमटे धरणातील पाण्याचा प्रश्‍न नक्कीच मार्गी लागणार आहे.

चंद्रकांत बामणे, रामराज

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी उमटे धरणातील गाळ काढण्याचा उचलेला मुद्दा खूप चांगला आहे. जर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता, तर पुढच्या काळात धरणामध्ये पाणीच शिल्लक राहिले नसते, ही वस्तुस्थिती आहे. सामाजिक बांधिलकीतून काम करणे सोपे नाही. आपला वेळ देऊन ही मंडळी काम करीत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अन्य मंडळींनीदेखील काम करणे आवश्यक आहे. त्यांच्यामुळे नक्कीच पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा विश्‍वास आहे.

भास्कर गवाणे, महान

Related

Previous Post

यंदा बाप्पाचे आगमन लवकर

Next Post

धक्कादायक! तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

लाडक्या बहिणींची पुन्हा धावाधाव

March 24, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

धक्कादायक! तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?