| पनवेल | वार्ताहर |
पनवेलजवळील टी पॉईंटकडून पळस्पेकडे जाणार्या रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने करंजाडे येथील सेवा रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकी धडकून दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. तर त्याच्याबरोबर असलेली महिला जखमी झाली आहे.
राहूल राजवर्धन (28) व त्याची मैत्रिण सिनीया कांबळे (26) सह दुचाकीवरुन पनवेल बाजूकडे येत असताना टी पॉईंटकडून पळस्पेकडे जाणार्या रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने करंजाडे येथील सेवा रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात राहुल हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. तर सिनीया ही जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.