शेकाप मध्यवर्ती समितीने मांडलेल्या ठरावांना एकमताने मंजूरी

| सांगोला | माधवी सावंत |

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी,नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती समितीच्या बैठकीचे शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.
या बैठकिच्या दुसऱ्या सत्राची सांगता दुपारी २ वाजता होणार आहे. तत्पुर्वी समितीने मांडलेले ठराव एकमताने संमत करण्यात आले.
यामध्ये सध्या सुरु असलेला शिक्षणाचा खेळखंडोबा थांबविण्याबाबत शेकापची आक्रमक भुमिका, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देणे, सोयाबीन पिक विमा योजना, विज बिलात रास्त सवलत तसेच शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत मांडलेल्या ठरावाला एकमताने मंजूरी देण्याच्या आली.
या बैठकीत पुढील पक्षबांधणीच्या कामाचे नियोजन तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख,क्रांतीवीरांगणा हौसाक्का पाटील,सुलभाकाकू पाटील आदी मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्य मध्यवर्ती समितीची बैठकीला आ. बाळाराम पाटील, कार्यालयीन चिटणीस राजू कोरडे, प्रा. एस व्ही जाधव, माजी आम.धैर्यशील पाटील, संपतबापू पवार, राहुल पोकळे, चंद्रकांत देशमुख,डॉ अनिकेत देशमुख,रायगड जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील , रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version