भिलवले धरण परिसरात अनधिकृत बांधकाम

| रसायनी | वार्ताहर |

चौक भिलवले धरणात व्यावसायिकाने दगड माती व उत्खलन करून बुजवण्याचे काम सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे. धरण परिसरात मातीचा भराव झाल्याने निसर्गाचे अतोनात हानी होत आहे. सदर व्यावसायिकांनी शासनाचा महसूलसुद्धा बुडवला आहे. त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग कर्जत रायगड यांच्याकडे लेखी तक्रार व नायब तहसीलदार खालापूर यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली आहे.

सदर व्यावसायिकांनी तेथील जागा पूर्ववत करावी अन्यथा याप्रकरणी आम्हाला राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे दाद मागावी लागेल, अशी मागणी अरूण गोविंद जाधव, अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केली आहे.

भिळवले धरण परिसरात व्यावसायिकांनी भराव करुन अतिक्रमण केले आहे.त्यांच्याविरोधात राष्ट्रीय हरीत लवादाकडे दाद मागणार.

अरुण गोव़िद जाधव
अध्यक्ष-पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट
Exit mobile version