पेणमध्ये बांधकामांचा सुळसुळाट

अनधिकृत की अधिकृत; नागरिकांचा सवाल

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहराच्या भर बाजारपेठेत मोठया प्रमाणात जुनी कामे नव्याने सुरू आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात धुळीचे साम्राज्य दिसत आहे. बाजारहाट करणार्‍या नागरिकांना त्याला सामोरे जावे लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे ही कामे करताना समोरून ताडपत्री अथवा ग्रीन मॅट लावून समोरून झाकले जाते, जेणेकरून आतमध्ये काय चाललय याचा थांगपत्ता कुणाला लागू नये. या झाकण्या मागील नक्की हेतू काय, हे ही स्पष्ट होत नाही. कामे अधिकृत आहेत कि अनधिकृत, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत नगरपालिका बांधकाम विभागाने पाहणी करुन सोमवारी माहिती देतो, असे आश्‍वासित केले आहे.

काहीजणांनी तर  नगरपालिकेतून बांधकाम परवाना देखील घेतलेला नाही. तर काही जणांनी बांधकाम नव्याने करत आहेत. मात्र परवानगी दुरूस्तीचे काम मात्र नव्याने केले जात आहे. या कामांमुळे मोठया प्रमाणात शासनाची देखील फसवणूक होत आहे. जर बांधकाम नव्याने केल्यास नविन नियमानुसार रस्ता आणि सांडपाण्याची व्यवस्था होण्यासाठी गटाराला जागा सोडणे बंधनकारक आहे. ही जागा सोडायला लागू नये म्हणून जागा मालकांना बांधकाम करून देणारे ठेकेदार आयडीयाची कल्पना देतात आणि नव्याने बांधकाम करण्याची परवानगी घेण्यास सांगत नाहीत. तर, दुरूस्तीचे परमिशन घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे जागा मालक देखील ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार पत्रव्यवहार नगरपालिकेशी करतात आणि नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची दिशाभूल करतात. त्यामुळे कळत नकळत अवैध  बांधकामांना मोकळे रान मिळते.

अनधिकृत बांधकाम करून जागा न सोडता जागा मालकांचा फायदा करून दिल्याबाबत जास्तीचे पैसे सुध्दा घेतो. एकंदारीत बांधकाम करून देणारा ठेकेदार आणि अधिकारी वर्गाच्या संगनमता शिवाय ही बाब होत नाही. तरी अशा प्रकारचे अवैधरित्या बांधकाम करणार्‍या बांधकाम व्यवसायाविरूध्द व जमीन मालकाविरुध्द ठोस कारवाई न केल्यास भविष्यात अशा प्रकारचे अवैध  काम करण्यास दुजोरा दिल्याप्रमाणे होईल. तरी याकडे नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी पेणकर मागणी करत आहेत.

 पालिका चौकशी करणार
पेण नगरपालिकेचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांच्याकडे सदर प्र्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नगरपालिकेकडे वेगवेगळ्या दोघांनी बांधकामाची परवानागी मागितलेली आहे. परंतु, त्यातून एकाने दुरूस्तीसाठी परवानगी  मागितलेली आहे. आता मी कार्यालयात नसल्याने मला निश्‍चित नाव सांगता येणार नाही. परंतु, एवढे नक्की की एक दुरूस्ती करणार आहे व एक बांधकाम करणार आहे. आपल्याला कार्यालयातून योग्य ती माहिती घेऊन आपल्याला सोमवारी देतो, असे आश्‍वासित केलेले आहे.

Exit mobile version