शेतघरांच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम

पाली तहसीलदार कारवाई करणार का?
| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यात शेतघराच्या नावाखाली अनाधिकृत बंगलो करून खरेदी-विक्रीचा सर्रास व्यवसाय सुरू आहे. सुधागड तालुक्यात विकासक मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करत असून बिनशेती न करता अनेक ठिकाणी शेतघरांच्या नावाखाली अनाधिकृत बांगलो बांधून खरेदी-विक्री जोरदार सुरू असल्याचे समजते. सुधागड महसूल विभागाच्या कार्यालयात उपलब्ध माहितीनुसार 480 अनाधिकृत शेतघरांची नोंद असल्याची माहिती समजते.

सुधागड तालुक्यात अनधिकृत बिनशेती बांधकामांना शेतघर ठरवून त्यांच्यावर किरकोळ दंडात्मककारवाई केली जाते. परंतु या शेतघरांची पाहणी केल्यास सदरची शेतघरे नसून अलिशान बंगले, फार्म हाऊस आहेत. अशा बांधकामांना वाणिज्य दराने कारवाई होणे गरजेचे असून मात्र अशा बांधकामांना शेतघरातच्या दंड आकारणी करून दंड वसुली केली जात आहे.अशा बांधकामवर शेतघराच्या दंडाची वसुली गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाचा मोठ्या स्वरूपात महसूल बुडत असून अशा अनधिकृत शेतघरांची पाहणी करुन कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. दरवर्षी फक्त दंडात्मक कारवाई केली जाते.पण सुधागड तालुक्यात कृषक भूखंडाचे अकृषक मध्ये रूपांतर करून घर बांधकाम करण्यास प्रशासनच्या वतीने रितसर परवानगी दिली जाते. मात्र सुधागड तालुक्याच्या अनेक ठिकाणी कृषक भूखंडावर गेल्या दहा-बारा वर्षांत शेकडो अनाधिकृत शेतघरांचे बांधकामे झाली असून फक्त दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एकदा का कारवाई झाली कि आपली जबाबदारी संपली आशा पद्धतीने वर्षानुवर्षे दंडात्मक कारवाईची परंपरा जपत असल्याचे चित्रं सध्या सुधागड तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

Exit mobile version