कोर्लईत सीआरझेड उल्लघंन करून अनाधिकृत बांधकाम

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे अनधिकृत 19 बंगल्याचे प्रकरण ताजे असताना एका धनदांडग्याने सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्लई येथील उज्वलसिंग यांनी वाणिज्य कारणासाठी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अतोनात नुकसान केले. बांधकामासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही परवानगी घेतली नाही अशी फिर्याद रेवदंडा पोलिस ठाणे येथे बोर्लीचे मंडळ अधिकारी तुषार लक्ष्मण काकडे यांनी केली आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक दिपक म्हशीलकर करीत आहेत.

Exit mobile version