| रेवदंडा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे अल्पवयीन मुलींवर लैगिक शारिरिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून रेवदंडा पोलिस ठाणे येथे पिडीतेच्या पालकांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोर्लई कोळीवाडयातील सात वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलगी लहान भाऊ व लहान बहिण यांना सोबत घेऊन समुद्र किनारी शौचालयास आली होती. कोर्लई समुद्र किनारी लावण्यात आलेल्या होडयामध्ये शुक्रवारी (दि. 27) रोजी दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास कोर्लई येथील बावीस वर्षीय आर्यन दिपक कोटकर याने एका बोटीत घेऊन जाऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केले. पिडीत मुलगी, ती अल्पवयीन असल्याचे माहित असून सुध्दा तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या असलेल्या मच्छीमार बोटीत घेवून तिच्यावर लैगिक शारिरिक अत्याचार करून गंभीर दुखापत केली. याबाबत पिडीत मुलींच्या आईने अल्पवयीन मुंलीस विश्वासात घेतले व त्यानंतर अल्पवयीन पिडीत मुलींने घडलेला प्रकार कथन केला त्यानंतर याबाबतची तक्रार अल्पवयीन पिडीत मुलींच्या चाळीस वर्षीय आईने रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हा फरार झाला असून पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथक नेमले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आता केली जात आहे.
याबाबत अमंलदार म्हणून महिला पोलिस उपनिरिक्षक एम.टी.शिंदे अलिबाग पोलिस ठाणे हे विशेष तपास करीत आहेत. तर रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार कुष्णकांत थळे हे दाखल अंमलदार आहेत. तर मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नामदेव बंडगर हे अतिरिक्त कार्यभार म्हणून रेवदंडा पोलिस ठाणे येथे क्रियाशील आहेत.