वाचनालयाला अनधिकृत बांधकामाचा विळखा

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद मधील दहिवली भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहेत असे बोलले जात आहे. त्यात आता कर्जत नगरपरिषदेचे जुने प्रभाग कार्यालय असलेल्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी बनविण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाला अनधिकृत बांधकामांनी वेढा घातला आहे. दरम्यान,कर्जत नगरपरिषदमधील माजी नगराध्यक्ष स्थानिक रहिवासी राजेश लाड यांनीच पालिकेचे अनधिकृत कमानीवर नियंत्रण राहिले नाही असा आरोप केला आहे.
काही महिन्यांपूर्वी कर्जत शहरातील श्रीराम पूल बहगतील अनधिकृत बांधकामे, टपर्‍या, दुकाने. नुकतेच काही दिवसांपूर्वी श्रीराम पुलावर नव्याने होऊ घातलेल्या अनधिकृत टपर्‍या नगरपरिषदेने हटवल्या होत्या. मात्र पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतरच कारवाई करते काय? असा सवाल स्थानिक उपस्थित करू लागले आहेत. कारण दहिवली भागात प्रवेश करताना सर्वांचे स्वागत तेथे वेडीवाकडी उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे आणि त्यांनी हा परिसर व्यापून टाकला आहे. त्यात या भागात पूर्वीचे दहिवली तर्फे नीड ग्रामपंचायतचे कार्यकाळायला तपात्यांनी वेढा घातला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे पालिकेचे वॉर्ड कार्यालय बनविण्यात आले,मात्र त्या ठिकाणी पालिकेने ती जागा श्री विवेकानंद वाचनालयाला दिली आहे. मात्र त्या ठिकाणी चोहोबाजूंनी झालेली अनधिकृत बांधकाम पहिले कि सार्वजनिक वाचनालय कुठे आहे हे शोधण्याची वेळ वाचकांवर आली आहे.
पालिकेकडून याच सार्वजनिक वाचनालयाच्या समोर असलेली अनधिकृत बांधकामे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पुढाकार घेऊन तोडली होती. त्यानंतर त्या ठिकाणी ओपन जीम चे साहित्य बसविण्यात आले होते.मात्र आता तो संपूर्ण परिसर अनधिकृत बांधकामे,बेकायदा उभ्या राहिलेल्या टपर्‍या यांनी व्यापून गेला आहे.त्यात पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कोणतीही कारवाई शहरात दररोज होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर करताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version