सोसायटी, शाळा चेअरमन, मुख्याध्यापकांची बैठक
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
सिवूड्स वाहतूक चौकी येथे सिवूड्स हद्दीतील सोसायटी/ शाळा यांचे चेअरमन व मुख्याध्यापक यांची अनधिकृत पार्किंगबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांना सूचना देण्यात आल्या.
सोसायटी मधील सदस्यांनी त्यांची वाहने ही सोसायटीच्या बाहेर लावू नये. सोसायटी मधे जर वाहन पार्किंग साठी जागा नसेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्क न करता कोणत्याही एका बाजूस पार्क कराव्यात व एका बाजूचा रस्ता आपत्कालीन वाहने, कचऱ्याची वाहने, रुग्णवाहिका यांच्यासाठी खुली ठेवावी. सोसायटी सदस्य जर त्यांची वाहने सोसायटी बाहेरील रस्त्यावर लावत असतील तर त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या नावाचे स्टिकर्स बनवून ते त्यांचे वाहनांवर लावावेत जेणेकरून सदर वाहनांवर वाहतूक विभागाची सततची कारवाई टाळता येईल. आपले विभागामध्ये जर बेवारस वाहन पार्क झालेल असेल तर त्याचा जीपीएस फोटो सिवूड्स वाहतूक शाखेच्या व्हॉट्सऍप नंबर वर पोस्ट करावा जेणेकरून ह्या गाड्यांवर महानगर पालिके मार्फतीने काढण्याची कारवाई करता येईल. अनधिकृत ऑटो रिक्षा स्टँडस वर कारवाई करण्यासाठी त्यांना आश्वासित केले आहे. अनधिकृत फेरीवाले यांचेवर महानगर पालिके मार्फतीने कारवाई करण्यासाठी त्यांना आश्वासित केले आहे.
सर्व सोसायटी च्या चेअरमन यांना एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये सिवुड्स वाहतूक शाखेचा नंबर समाविष्ट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून सर्व सोसायटी धारकांना सिवुड्स वाहतूक शाखेशी त्वरित संपर्क करता येईल. सिवूड्स विभागातील सर्व शाळांना त्यांचे शाळेबाहेर 200 मीटर्स पर्यंत कोणत्याही प्रकारच्या गाड्या न लावण्याबाबत सांगण्यात आले. शाळेमध्ये जेव्हा पालक आपल्या पाल्यांना सोडायला किंवा नेण्यासाठी येताना आपली गाडी न आणता पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करावा. सिवूड्स रेल्वे स्टेशन येथून रेल्वे ने प्रवास करणाऱ्या मेंबर्स ना मॉल समोर पार्किंग न करता मॉलची अंडरग्राउंड पार्किंग वापरण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहतुकीच्या इतर नियमांबाबत प्रबोधन केले. मपोनि मोहिनी लोखंडे व पोहवा सचिन कडू यांनी येथील सदस्यांना मार्गदर्शन केले.






