। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका क्षेत्रात मोकळ्या जागांवर अनधिकृत टपर्या आणि हातगाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज 20 ते 30 रुपये पावतीच्या नावाखाली वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, काही वेळा ही रक्कम पावतीशिवायच वसूल केली जात आहे. तर, काही वेळा बनावट पावत्या देऊन ही प्रक्रिया सुरू आहे, अशी गंभीर माहिती समोर येत आहे.
शहरातील विवेकानंद चौक, गांधी चौक, राजपाल नाका, कामठा रस्ता, पालवी हॉस्पिटल, मासळी मार्केटसारख्या ठिकाणी भररस्त्यावर टपर्या व हातगाड्यांद्वारे व्यवसाय सुरू आहेत. स्थानिक व्यापार्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पावती फाडा आणि टपरी उभी करा’, अशी एक अघोषित योजना पालिका क्षेत्रात सुरू आहे. या टपर्यांमधील बहुतांश व्यापारी शहराबाहेरून येतात. पूर्वी आठवड्यातून एकदा येणार्या व्यापार्यांनी आता दररोज बोगस पावत्यांच्या आधारे कायमस्वरूपी टपर्या उभारल्या आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापार्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.