| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील आदाड गावच्या ग्रामस्थ मंडळ व कोजागरी मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उंडरगाव कबड्डी संघाने अंतिम फेरीत जय हनुमान संघ उसरोली कबड्डी संघाचा पराभव करीत ही स्पर्धा जिंकली.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत तिसरा क्रमांक मोरे गावच्या संघाला मिळाला. सूत्रसंचालन महेश वाडकर यांनी केले. स्पर्धेसाठी निलेश पाटील, नितेश नाक्ती, दिनेश गायकर, मंगेश आरकर ,विनोद पाटील, नारायण नाक्ती, राजेश पाटील, चेतन पाटील, विनोद पाटील, मंगेश वाडकर, संतोष वाडकर, सूर्यकांत पाटील, संकेत पाटील आदींनी परिश्रम घेतले.