| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा नगर पंचायत हद्दीतील अती दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या दुर्गवाडीत स्मशान भूमीचा मोठा प्रश्न भेडसावला होता. गावापासून सुमारे एक किमी अंतराचे उतार वळणावर स्मशानभूमी असल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी उपक्रम करण्यासाठी फारच जिक्रीचे होत असताना खा. सुनिल तटकरे यांनी विशेष बाब म्हणून नगर पंचायती मार्फत तातडीने 15.5 लक्ष रुपये मंजुर करून प्रशस्त अशी जळीतशेड व निवाराशेडचे बांधकाम करून या स्मशानभूमीला मुक्तीधाम असे नामकरण करण्यात आले आहे .बांधण्यात आलेल्या या मुक्तीधामचे उद्घाटन खा.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, समीर बनकर, असहल कादिरी, सुनिल शेडगे, संजय कर्णिक, बबन मनवे, नाझीम हसवारे, सोनल घोले, शाहीद उकये, सलीम चोगले, शाहीद जंजीरकर, नौसीन चोगले, सतिश शिगवण, महेश घोले, नईम दळवी, समीर काळोखे, स्वप्नील चांदोरकर, संतोष मांडवकर, धोंडू बांद्रे, सुभाष कदम, रघुनाथ बांद्रे, विनोद बांद्रे, केतन शिंदे, वसंत खोपरे आदी मान्यवर उपस्थित होते.