चौदा वर्षांखालील टेनिस स्पर्धा

अधिराज, आरव, प्रार्थनाचा उपांत्य फेरीत प्रवेश

| पुणे | वृत्तसंस्था |

शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे आयोजित चौदा वर्षांखालील गटाच्या अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुले व मुलींच्या गटातून अधिराज दुधाणे, आरव पटेल व प्रार्थना खेडकरने मानांकित खेळाडूंना हरवून उपांत्य फेरी गाठली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात सहाव्या मानांकित आरव पटेलने अव्वल मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डीचा 6-3, 6-1 असा, बिगरमानांकित अधिराज दुधाणेने चौथ्या मानांकित अंश रामाणीचा 6-4, 6-2 असा, तिसर्‍या मानांकित सर्वज्ञ सरोदेने यशवंतराजे पवारचा 6-4, 6-3 असा तर नमिश हुडने अंशुल पुजारीचा 6-3, 7-5 असा पराभव केला.

मुलींच्या गटात पाचव्या मानांकित प्रार्थना खेडकरने अव्वल मानांकित श्रावी देवरेवर 0-6, 6-3, 6-4 असा, शर्मिष्ठा कोद्रेने ओवी मारणेवर 6-1, 6-1 असा, दुसर्‍या मानांकित स्वरा जावळेने आठव्या मानांकित वीरा हरपुडेवर 6-0, 4-6, 6-3 असा तर तिसर्‍या मानांकित जान्हवी चौगुलेने रितू ग्यानवर 6-2, 6-1 असा विजय मिळविला.

Exit mobile version