विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत नागावातील ४२० ग्रामस्थांचे लसीकरण एक दिवसात पूर्ण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत परिसरात विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत गावातील ४२० ग्रामस्थांचे लसीकरण एक दिवसात पूर्ण करण्यात आले आहे.
त्यासाठी समीरा ग्रुपचे समीर नेरूरकर, सचिन राउळ व पुनीत मकर यांनी लस उपलब्ध करून दिली. तसेच श्री विरेन वैद्य यांनी लस स्टोअर करण्यासाठी डीपफ्रीज नागांव लसीकरण केंद्रास भेट म्हणून दिला.
सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत व सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजक, नागांव ग्रामस्थ, पंचायत सदस्य, पंचायत कर्मचारी , सुश्रुत हॅास्पिटल-चेंबूर यांनी सहकार्य केले.
सचिन राउळ यांनी काही लस स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. नागाव ग्रामपंचायत चे सरपंच निखिल मयेकर यानी विशेष आभार मानले आहे. लस हवी असल्यास व ग्रामपंचायत कार्यालयात नावनोंदणी केली नसल्यास पुढील येणाऱ्या लसीसाठी आपली नावे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन नोंदणी करावी. सर्वांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सरपंच निखिल मयेकर यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version