| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील निगडोली गावातील घरातून निघणारे सांड पाण्यासाठी भुयारी गटाराचे काम सहा वर्षांपूर्वी पुर्ण झाले. मात्र, वाहनांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेली लोखंडी जाळीच्या झाकणांची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे अपघताला निमंत्रण ठरत आहे.
निगडोली येथून खोपोलीडे जाणारा जवळचा मार्ग असल्यामुळे परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात. परिणामी या रस्त्यावर बांधण्यात आलेले आरसीसी भुयारी गटार आता अपघातांचे केंद्र बिंदु बनत आहे. तसेच, अनेक ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात आली असून, वहानांच्या वर्दळीमुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. येथिल काही तरुणांनी या ठिकाणी खराब झालेल्या जाळीत झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तातडिने निदर्शनास येताच अपघातावर नियंत्रण करणे सोपे जात आहे. त्यामुळे या गटारावरील तुटलेल्या जाळीच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणी वाहनचालक करीत आहेत.
भुयारी गटारे अपघाताला निमंत्रण
