इतिहासाच्या वाचनापेक्षा आकलन महत्त्वाचे – शिवराज गायकवाड

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करताना वाचनापेक्षा समजून घेण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन दोडामार्ग नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी केले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षांविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, दोडामार्ग नगर पंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड आणि वैभववाडी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले की, अभ्यास करताना लक्षात न राहणार्‍या गोष्टी किंवा घटनेच्या नोट्स काढून एका वहीत लिहून ठेवाव्यात व त्याचा सराव करावा. ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या गोष्टी वगळून पुन्हा एक मायक्रो नोट्स तयार कराव्यात. जेणेकरुन आपला अभ्यास सोपा होईल. स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आल्यास खचून जावू नका. बरेच विद्यार्थीं हे मुखालखीच्या टप्प्यापर्यंत पोहोचून त्यांना पद मिळत नाही. त्यावेळी आपला आत्मविश्‍वास कमी पडू देवू नका. स्पर्धा परीक्षाची सुरुवात करताना ज्या विषयाची आवड आहे, त्या विषयापासून अभ्यासाची सुरुवात करा. एमपीएससी अथवा युपीएससीचा अभ्यास करताना आपण पूर्व परीक्षेवर फोकस करावा. पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा आहे
याप्रसंगी सत्राची प्रस्तावना करताना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल माहिती दिली. तसेच यावेळी स्पर्धा परीक्षांचे स्वरुप, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पुस्तकांची निवड, अभ्यास पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version