जिल्हास्तरीय कुस्तीत पीएनपीचे निर्विवाद वर्चस्व

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पोलीस मुख्यालय कळंबोली, नवी मुंबई येथे दि. 8 सप्टेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग, रायगड व पोलीस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. पीएनपी महाविद्यालय शिक्षणासोबतच खेळालासुद्धा तितकेच महत्त्व देत आहे.

19 वर्ष वयोगट 57 किलो वजनी गट फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत पारस प्रमोद पाटील प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगट 55 किलो वजनी गट ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत विनय केशव पाटील प्रथम क्रमांक, 19 वर्ष वयोगट 130 किलो वजनी गट ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत वेदांत राजेश पाटील प्रथम क्रमांक, 17 वर्ष वयोगट 45 किलो वजनी गट फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत यश कृष्णा मेंगाळ द्वितीय क्रमांक, 17 वर्ष वयोगट 48 किलो वजनी गट फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत संचित संतोष गायकवाड याने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या खेळाडूंचा संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक तेजेश म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version