कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

| म्हसळा | वार्ताहर |

मामाच्या सांत्वनसाठी गेलेल्या भाचीचा देवघर कोंड येथे कारखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. अनघा चाळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कारचालक अभिमन्यू हा पुण्याहून कुडतुडी येथे आपल्या आई, दोन बहिणींना घेऊन मामाच्या घरी सांत्वनसाठी जात होता. देवघर कोंड या खराब रस्त्यावरुन कार नेत होता. मात्र, रस्त्यावर खडी असल्याने त्याची कार पुढे जात नव्हती. त्यावेळी अनघा आणि मेघा या दोघी बहिणी मदतीसाठी कारमधून खाली उतरल्या. कार थांबविण्याचा प्रयत्नात खडीवरून त्या खाली घसरुन पडल्या. एवढ्यात कार माघारी आली आणि थेट अनघा यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात मेघा मोरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना आरोग्य अधिक्षक डॉ. महेश मेथा यांनी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी माणगाव येथे पाठविले. सदर अपघाताची नोंद म्हसळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version