| उरण | वार्ताहर |
उरण-पनवेल रस्त्यावरील गव्हाणफाटा येथे झालेल्या अपघातात सेजल आंबेतकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात हा ट्रेलरचालकाच्या हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातास अनधिकृत कंटेनर यार्ड व दुर्लक्ष करणारे प्रशासनच जबाबदार तसेच आणखीन किती सेजलचे जीव घेणार असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.

बुधवारी सकाळी उरण चारफाटा येथील गौरीनंदन येथे आत्याकडे वास्तव्यास असलेली सेजल आंबेतकर ही उरणहून वाशिकडे जात असताना गव्हाण फाटा फलक्रम यार्डजवळ ट्रेलरला धडक बसत अपघात होऊन जबर जखमी झाल्या. तिला वाशी येथील एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सेजल आंबेतकरचा मृत्यू झाला.