| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत एका 60 वर्षीय बेवारस अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहे. सदर व्यक्तीचा रंग सावळा, उंची साडे 5 फुट 2 इंच, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, डोक्याचे व दाढीचे केस काळे पांढरे व वाढलेले, कपाल मोठे, नाक सरळ असा पेहराव आहे. सदर व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्याशी संपर्क साधावा.







