। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तीन सिल्वर रंगाच्या इनोवा कार आहेत. त्यामध्ये काही शस्त्रधारी लोक आहेत अशा मजकूराचा संदेश व्हाटस्अॅप वरुन रविवार पासून रत्नागिरी तसेच रायगडात व्हायरल होत होता. त्यामुळे खबरदारी म्हणून रायगड पोलिसांनी सर्वत्र कडक नाकाबंदी सुरु केली. परंतु या नाकाबंदी काहीच संशयास्पद न आढळल्याने सदर मेसेज हा एक अफवेचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
रविवारपासून रायगड तसेच रत्नागिरी परिसरात ठिकाणांची नावं बदलून काही समाज कंटकांनी समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे मेसेज पोस्ट केले. त्या मेसेजनुसार ङ्गतीन सिल्वर रंगाच्या इनोवा कार आहेत. त्यामध्ये काही शस्त्रधारी लोक आहेत अशी माहिती अलिबाग रायगड कंट्रोल रूम येथुन मिळालेली आहे. तरी सदर वर्णनाच्या संशयित इनोवा कार आपले परिसरात मिळून किंवा दिसून आल्यास त्याबाबत योग्य ती खबरदारी व सतर्कता बाळगून मुरुड पोलीस ठाणे येथे त्याबाबतची माहिती तात्काळ कळविण्यास विनंती आहे.फफ अनेक व्हाटस्अॅप गु्रपवर हा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांपर्यंत हा मेसेज पोहचल्यानंतर पोलिसांनी खातरजमा केली असता असाच मेसेज रत्नागिरी परिसरात देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे खबरदारी म्हणून रायगड पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. मात्र या नाकाबंदी दरम्यान अशा वर्णनाचे वाहन अथवा संशयास्पद शस्त्रधारी असा कोणताही प्रकार आढळून आला नाही. त्यामुळे सदर प्रकार म्हणजे समाजकंटकानी अशांतता पसरविण्याच्या मनसुब्यातून अफवेचाच प्रकार असल्याचे उघड झाले.
अशा प्रकारची कुठलाही प्रकार घडलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरुन जाऊ नये.
अशोक दुधे पोलिस अधिक्षक रायगड