अनोळखी इसमाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

जेएनपीटी-पनवेल महामार्गावरील जुन्या टोलनाका परिसरात, निलेश ढाब्याजवळ सुमारे 60 वर्षीय अनोळखी इसम जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या उजव्या हातावरून वाहन गेल्याने पंजा व मनगटाचा चुरा झाला होता. शरीरावरही किरकोळ जखमांच्या खुणा आढळल्या. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्याबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे : 8591424350 किंवा तपास अधिकारी पोलीस नाईक रविंद्र पारधी : 7900031651 यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

Exit mobile version