युनियन बँकेची उपांत्य फेरीत धडक

। मुंबई । प्रतिनिधी ।
होतकरू, संघर्ष, कर्नाळा स्पोर्ट्स, शिवशक्ती धुळे, महात्मा गांधी, जिजामाता पोलीस, माऊली यांनी शिवनेरी महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. युनियन बँकेची विशेष व्यावसायिक गटात उपांत्य फेरीत धडक. संघर्ष विरुद्ध महात्मा गांधी आणि शिवशक्ती(धुळे) विरुद्ध राजमाता पोलीस हे दोन उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. ब गटात कर्नाळा स्पोर्टसने विश्‍वशांतिला चकवीत बाद फेरीत आपली जागा बनविली. इ गटात महात्मा गांधीने जिजामाता पोलीस संघाचा पराभव करीत या गटात अव्वल स्थान मिळविले. क गटात स्वराज्यने शिवशक्ती धुळेला नमवित बाद फेरी गाठली. पुरुष विशेष व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात युनियन बँकेने मुंबई बंदर संघाचे आव्हान 34-21 असे मोडीत काढत उपांत्य फेरी गाठली.

Exit mobile version