महाराष्ट्रातून नारायण राणे, रणजीत नाईक निंबाळकर, हिना गावित यांच्या नावाची चर्चा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना हावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील 17 ते 22 मंत्र्यांचा शपथविधी 7 जुलैला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात 81 सदस्य असतील. सध्या 53 मंत्री आहे, म्हणजे 28 मंत्री सहभागी होणार आहे. मोदी सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण केली आहे. सरकारी सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बर्याच जणांना संघटनांच्या जबाबदार्या दिल्या जाऊ शकतात. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहर्यांचा समावेश असू शकतो. मंत्रिमंडळात प्रादेशिक पक्षांना समाविष्ट करण्याचीही तयारी आहे.