आरसीएफ प्लांटची पाहणी आणि बैठक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा आज शनिवार दिनांक 7 मे 2022 रोजी रायगड दौरा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 7 मे 2022 रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान आरसीएफ बैठक आणि प्लांट पाहणी, चेंबूर, मुंबई, सायंकाळीं 4 वाजता आरसीएफ प्लांट येथून अलिबाग कडे प्रयाण, सायंकाळी 5 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन, सायंकाळी 5.30 वाजता समुद्र मार्गे मांडवा जेटी येथे आगमन, सायंकाळी 7 वाजता अलिबाग येथे आगमन व मुक्काम रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 9.30 वाजता आरसीएफ युनिट बैठक आणि प्लांट पाहणी दुपारी 3 वाजता मांडवा जेटी कडे प्रयाण 4 वाजता समुद्रमार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता वाशी नवी मुंबई येथे शिव विष्णू मंदिर येथे बसवेश्वर जयंती कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता मुंबई विमानतळाकडे प्रयाण, रात्री 8 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन रात्री 8.55 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण, रात्री 11 वाजता दिल्ली विमातळावर आगमन, 11.20 वाजता दिल्ली विमातळ येथून निवासस्थाकडे प्रयाण रात्री 11.50 वाजता दिल्ली निवासस्थान येथे आगमन.