कोकणभूमी प्रतिष्ठानचा अनोखा प्रयत्न , लक्ष्मी व नूरानी बोटींनी प्रथम क्रमांक पटकावला
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोकणभूमी प्रतिष्टान व जंजिरा ऍडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप आयोजित राजपुरी खाडीत रंगल्या शिडाच्या बोटींच्या शर्यती. मुरुड राजपुरी येथील शिडाचे बोट धारक वर्षभर लाखो पर्यटकाना सुरक्षित जंजिरा किल्ल्यात आपल्या बोटीतून नेतात .त्यांच्या ह्या कामःचा गुणगौरव व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंजिरा किल्ल्यासमोर शिडाच्या बोटींच्या स्पर्धा आयोजित केल्यात जलवाहतूक राजपुरी व खोरा या बोटधारकांची करमणूक व पर्यटकांना आनंद देण्यासाठी दर वर्षी मार्च महिन्यात शिडाच्या बोटींच्या 2 गटात स्पर्धा भारावल्या जातात.
स्पर्धेचा मुख्य उद्देश बोट धारकाला पर्यटकांची उत्सहात काम करण्याची स्पुर्ती मिळावी हाच आहे व हवेच्या जोरावर शिडाच्या बोटी स्पर्धेत कश्या धावतात हे पर्यटकां पाहण्याचा अनुभव देण्यासाठी घेण्यात येतात. ह्या वर्षी छोट्या गटात प्रथम क्रमांक लक्ष्मी बोट, दुसरा क्रमांक सुलतान बोट,तिसरा क्रमांक सुलतानी बोट व मोठ्या गटात प्रथम क्रमांक नूरानी बोट ,दुसरा क्रमांक दस्तगीर बोट, तिसरा क्रमांक अकबरी बोट .दोन्ही स्पर्धेत 12 बोटी सामील झाल्या त्यातील 6 बोटींना रोख रक्कमम व पारितोषिक देण्यात आले.
ह्या स्पर्धेसाठी राजपुरीच्या बोटी जयंत तयारी करतात .आपल्या बोटीचे रंगकाम करतात .बोटीचे शीड नवीन किंवा दुरुस्त करून सज्ज करतात .कारण हि बोट हवेच्या दाबावर चालते .बोट जेटीवरून सुटल्यावर अगरदांडा जेटीला राउंड मारून पुन्हा राजपुरी जेटीकडे परतायचे असते .परंतु जाताना बोटी अतिशय स्पीडमध्ये जातात ,पण येताना शीड हवेप्रमाणे फिरून शिडावर बोटीचा समतोल राखून मोठ्या हिमतीने समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत अटीतटीची स्पर्धा करत राजपुरी जेटीवर पोचतात .त्या प्रसंगी राजपुरी येथील गावकरी व किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक खप आनंद घेतात .अशा स्पर्धा मुरुड किनारी व्हाव्या अशी मागणी पर्यटक करत आहेत.
कोकणभूमी प्रतिष्ठाचे अध्यक्ष संजय यादवराव म्हणले 1 मे रोजी राजपुरी समुद्रात मोठ्याप्रणात बोटीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे ,महाराष्ट्रातील पर्यटक स्पर्धा पाहण्यासाठी येतील अशे नियोजन करण्यात येणार आहे ,जेणे करून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे संख्या वाढेल .येणाऱ्या पर्यटकांना सकाळी बोटीतून समुद्रात नेण्यात येईल मासेमारी करून त्यांना बोटीवर जेवण दिले जाईल अशे वेगळे पर्यटन करण्याचा मानस आहे .ह्यस्पर्धा घेण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांची मदत झाली .सोबत श्रीकांत सुर्वे ,प्रकाश सरपाटील ,जावेद कारभारी,राजपुरीच्या बोट मालक ,व नागरिक यांची मदत झाली.