| श्रीवर्धन । वार्ताहर ।
पक्ष वाढीसाठी विविध राजकीय पक्ष आपल्या युक्तीनुसार अनेक लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करत असतात श्रीवर्धन शहर शिवसेना संघटनेने मात्र नवीनच शक्कल लढवलेली दिसत आहे. संघटना वाढीच्या दृष्टीने ‘आती रहेगी बहारे’ या संघीत मैफिल थोडक्यात ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. अटकेपार झेंडा फडकवणारे महापराक्रमी श्रीमंत बाजीराव पेशवे मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार प्रस्थापित झाल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचे आसताना देखील श्रीवर्धन शहरात शिवसेनेच्या माध्यमातून विकास काम झालेली नाहीत. अनेक वर्षे शिवसेना पक्षाकडून निवडून येणारे माजी विरोधीपक्ष नेते अनंत गुरव यांच्या प्रभागात अनेक विकास काम रेंगाळलेली आहेत. अनंत गुरव हे आपल्या समाजकार्यावर व पक्षावर निवडून येतात. म्हणून त्यांचा मतदार संघ जाणून बुजून विकासापासून वंचित ठेवला गेला आहे. त्यांच्या प्रभागात भरीव निधी आणून रखडलेली विकासकाम करण्याचे सोडून निवडणुका तोंडावर आल्यावर पक्षावाढीच्या दृष्टीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्याची एक वेगळीच शक्कल शहरातील पदाधिकारी यांनी लढवली आहे. अनेक राजकीय पक्ष लोकोपयोगी कार्यक्रम करताना गोर गरीबांना साहित्य वाटप, रुग्णांना फळ वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप तर काही रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबीर इत्यादी कार्यक्रम आयोजित करतात. मात्र नाच गाण्याचा कार्यक्रम सादर करून पक्ष वाढवण्याचा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न येत्या निवडणूक काळात किती पचनी पडणार अशी चर्चा श्रीवर्धन मध्ये होत आहे.
नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी पक्षाला घेरणारे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असोत आदी विविध मुद्दे आहेत. मात्र हे मुद्दे सोडूूून स्नेहभोजन, व नाच गाण्याचे कार्यक्रम करण्यात सेनेचे पदाधिकारी व्यस्त आहेत. भ्रष्टाचार व अन्यया विरुद्ध पेटूून उठणार्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या शिवसैनिकांची कुठेतरी कमी भासत असल्याची खंत एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
पक्ष वाढीसाठी शिवसेना पदाधिकार्यांची अनोखी शक्कल
