मकरसंक्रांतीचा अनोखा गोडवा – धनंजय शेट्ये

“ शब्द असावा असा गोड जो,
माणूस, माणूस जोडित जावा
केवळ शब्दासाठी माणूस,
तोडिल ऐसा शब्द नसावा“
‘तीळगुळ घ्या गोड बोला!’

आमच्या बालपणी जानेवारी महिना उजाडला की आईची लगबग सुरू व्हायची. मकरसंक्रांतीला घरात गावात हळदीकुंकू असायचं. गावातल्या सर्व बायका एकत्र मिळून प्रत्येकाच्या घरी हळदीकुंकवाला यायच्या. फुलं वाटली जायची, तीळगुळ, तीळाचे लाडू आणि सवाष्ण वाण म्हणून कुंकवाचा करंडा, चहाची गाळणी अशा भेटवस्तू वाटल्या जायच्या. हा कार्यक्रम महिलांसाठी खूप जिव्हाळ्याचा असायचा. कष्टकरी महिलांना हा एक दिवस हक्काच्या विश्रांती असायचा. त्या निमित्ताने महिलावर्ग एकत्र दिसायचा. मकरसंक्रांतीची ही ओळख आजही तशीच टिकून आहे. आम्ही मुलं घरीच झाडूच्या हिरांपासून पतंग बनवून गोधडी शिवायच्या सुतगुंडीच्या दोराच्या सहायाने पतंग उडवायचो.

भारतीय परंपरा संस्कृतीने नटलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सण साजरा करण्यामागे एक वेगळाच आनंद असतो. आनंद मिळवायला आणि आनंदोत्सव साजरा करायला असे सण म्हणजे पर्वणीच असते. प्रत्येक प्रांतात सर्व सण हे वेगवेगळ्या परंपरा घेऊन वेगवेगळ्या रुपात समोर येत असतात. परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात एक वेगळाच आनंद असतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, ग्रह-तारे यांच्या दिशा परिवलन परिवहन गती यामुळे ॠतुबदलानुसार अनेक सण साजरे करण्याचे हेतु असावेत. पण काही का असेना भारतीय शेतकरी या सर्व सण उत्सवांचा उदगाता आहे. त्यामुळे सर्वच सण उत्सवाचा जनक हा भारतीय शेतकरीच असावा.
‘मकरसंक्रांत’ हा सण माणसामाणसातील नातेसंबंधाची, जिव्हाळ्याची वीण अधीक घट्ट करणारा सण होय. मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘तीळ’ हे धान्य सहाप्रकारे वापरात आणावे लागते. तीळाचे उठणे लावून आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणे, तीळाचे तेल शरीराला लावणे, तीळाच्या तेलाचीच देवघरात देवापुढे दिवाबत्ती करणे, तीळाचे लाडु वाटणे, तीळगुळाचे गोड-गोड पदार्थ सेवन करणे. तसेच माघ महिन्यात तिळाच्या सहायाने विष्णूदेवतेचे पूजन केल्यास विष्णू देव प्रसन्न होऊन आपण पापमुक्त होतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळ शनीदेवेतेला अर्पण केल्यास शनी देवता संतुष्ट होते. घरातील दुष्ट शक्ती नष्ठ केल्या जातात. श्राद्ध व इतर कार्यामध्ये तीळ अर्पण करण्यामागचा हेतु हाच की राक्षसी, पिशाच्च शक्तीला ‘तिलांजली’ दिली जाते. पुढे तिलांजली देणे’ हा वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झाला. त्यामुळे ‘तीळ’ या सर्वात लहान धान्य कणाला सूर्याच्या शक्तीचे सामर्थ्य दिले गेले. तीळ या धान्याला या सणात विशेष महत्त्व प्राप्त झाले. ही सर्व पौराणिक कारणे झाली.

मकरसंक्रांतीच्या सणाच्याबाबतीत वैज्ञानिक मुलाधार पण आहे. शिशिर ॠतुच्या आगमनाच्या काळात थंडीचे दिवस असतात. शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी तीळ आणि गुळ हे महत्त्वाचे कार्य करीत असतात. सूर्याचा मकरराशीत प्रवेश होत असताना हा आनंदोत्सव साजरा करण्याचा मुळ हेतू हाच आहे की, ज्या प्रदेशात सूर्याची किरणे सर्वप्रथम पडतात तिथले लोक हे आनंदीत हे होणारच मग सहाजिकच असे सण उत्सव साजरे केले जातात.

महाभारत काळात कुरु वंशाचे संरक्षक पितामह भिष्म बाणांच्या शय्येवर असताना मृत्युची प्रतिक्षा करीत उत्तरायणाच्या प्रारंभाची वाट पाहत होते. ते उत्तरायण हे मकरसंक्रांतीच्या दिवशी सुरु होत. म्हणुन या दिवसाला महाभारत काळातही वेगळेच महत्त्व होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची अनोखी प्रथा आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी अबालवृद्ध सर्वच संपूर्ण दिवसभर आकाशात सूर्य असेपर्यंत सूर्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी आकाशात पतंग उडवले जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा

Exit mobile version