अस्थिकलश यात्रेत केंद्राच्या विरोधात एकजूट

। मुंबई । प्रतिनिधी ।
कृषी कायदे रद्द करा,या मागणीसाठी नवी दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाला 6 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. 1 वर्षाच्या कालखंडात आंदोलन करणारे देशातील 700 वर शेतकरी शहीद झाले. त्या शेतकर्‍याच्या अस्थिकलश मुंबईत आणण्यात आला होता.या अस्थिकलश यात्रेत राज्यातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांसह कामगार,सामाजिक संघटना सहभागी झालेल्या होत्या. शिवाजी पार्क दादर मुंबई येथे शेकडो कामगार व शेतकरी यांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला अभिवादन करून किसान व कामगार संघर्ष अस्थीकलश यात्रेचे आगमन बाबू गेनू पुतळा परळ येथे झाले.त्यानंतर मंत्रालय समोरील महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन करून जाहीर सभा घेण्यात आली. सायंकाळी पाच वाजता अस्थिकलश यात्रेचा समारोप अस्थिकलशाचे विसर्जन गेटवे ऑफ इंडिया येथे करण्यात आले. मुंबई येथील अस्थिकलश यात्रेचे आयोजन संयुक्त किसान मोर्चा, जनआंदोलनाची संघर्ष समिती व कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये समारोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शेतकरी कामगार पक्ष,आप पक्ष, समाजवादी पक्ष इतर समविचारी पक्षांचे नेते,कामगार नेते तसेच जनआंदोलनाच्या संघर्ष समितीचे नेते सहभागी झाले होते.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे भांडुप, कल्याण,नाशिक,वाशी पारेषण झोन व मुख्य कार्यालय झोन मधील पदाधिकारी व सभासद यांनी आपल्या संघटनेचे बॅनर व झेंडे घेऊन फोरव्हिलर गाड्या घेवून शिवाजी पार्क दादर मुंबई येथे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर,उपसर्चिटणीस अरुण मस्के,संयुक्त सचिव काँग्रेस लिलेश्‍वर बनसोड, महिला आघाडीच्या अध्यक्षा कॉम्रेड भारती भोयर,केंद्रीय सल्लागार धनवटे मामा,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य गोरखनाथ पवार,शंकरदादा कोंडी लकर,आयटक ठाणे जिल्हा सचिव कॉम्रेड जनार्धन पाटील,भांडुप झोन सचिव विजय नाटकी, उपाझोनल सचिव सचिव जगदीश म्हात्रे, राजेश अहिरे,बुवा,राहुल मुळे, वाशी पारेषण झोन अध्यक्ष सुरेशस पवार,सचिव दिलीप पाटील, वाशी मंडळ सचिव शशिकांत मात्रे,कल्याण मंडळ सचिव सतीश म्हात्रे,महादेव गायकवाड, नाशिक सर्कल सचिव दिपक गांगुर्डे,सतीश पाटील,कॉम्रेड एस.आय.खान,विभागीय सचिव सतिष पाटील,योगेश साळवी, रितेश चव्हाण,दिपक दामधर, अतुल चव्हाण,रवींद्र सिंग चव्हाण,स्वप्निल राणे, अशोक बामगुडे व दिनेश पाटील, मुख्य कार्यालय झोनचे प्रतिनिधी कॉम्रेड विनोद गायकवाड इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते. शेतकरी अस्थीकलश यात्रेत कामगार नेते विवेक मोंटेरो, विश्‍वास उटगी, प्रकाश रेड्डी, संजय वढावकर, सुधाकर अपराज, निवृत्ती धुमाळ, मारुती विश्‍वासराव, मिलिंद रानडे, उदय भट, आदी मान्यवर, कामगार, कार्यकर्ते आदिवासी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version