दहीकाल्याची ऐक्य परंपरा

| मुरूड शहर | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव कोळीवाड्यात एकच वेशभूषा करून एक गाव एक दहीकालाची ऐक्यपरंपरा आणि संस्कृती कोळी बांधवांनी जपली आहे. यावेळी घरोघरी उभारलेल्या सुमारे 350 दहीहंड्या फोडण्यात आल्या.

कुडगाव कोळीवाड्यात शेकडो युवकांनी एकाच रंगाचा पोशाख परीधान करत अवघा रंग एक झाला असे ऐक्य परंपरेचे दर्शन घडविले. रमेश खरगावकर, देवेंद्र पाब्रेकर आणि पंचकमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दही काल्याचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. एक गाव एक वेशभूषा करून सामाजिक ऐक्याचा संदेश देताना दामोदर खरगावकर म्हणाले की, मान पानावरुन गावांतून वादविवाद होऊन गावातील वातावरण बिघडते. देव श्रीकृष्णाने सर्व थरांतील सावनकड्यांना सोबत घेऊन त्या काळात गोपलकाला सण साजरा करून सामाजिक एकोपा वाढीस लावला. त्याप्रमाणे आपणही वादविवाद हेवेदावे, सोडून, टाळून गोपलकालाचा आनंद लुटून आपापसांतील स्नेह वृद्धिंगत करावा आणि आपले सण गुण्यागोविंदाने साजरे करावेत, अशी भावना दामोदर खरगावकर यांनीं व्यक्त केली.

Exit mobile version