नृत्य स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव

| पाली । वार्ताहर ।

विद्यार्थी शालेय जीवनात शिक्षणाचे धडे गिरवतात त्याचबरोबर त्यांच्यातील असणारे सुप्त कलागुण हे नृत्य कला क्रीडातून बाहेर येतात. जेव्हा ते रंगमंचावरील रंगी बेरंगी प्रकाश झोतात सादरीकरण करतात तेव्हाच आपल्याला विद्यार्थ्यांमधील दडलेले सुप्त कलागुण पाहायला मिळतात. मगच होतो टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा भडीमार होऊन प्रेक्षक व पालक वर्ग प्रतिसाद देत असल्याचे गौरवोद्गार श्रीकांत मोरे यांनी रासळवाडी येथे काढले.


सुधागड तालुक्यातील रासळवाडी येथील जय भवानी ग्राम विकास सामाजिक सांस्कृतिक मंडळ यांच्यावतीने रासळ ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. मंडळाच्या वतीने भरवण्यात आलेल्या या नृत्य स्पर्धेमध्ये रासळ, अंबोले आणि वावे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 40 स्पर्धकांनी सहभागी होऊन विविध प्रकारचे उल्लेखनीय नृत्य सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, सागर मोरे, किशोर मोरे, कृष्णा मोरे, रामदास मोरे, सुनील मोरे, अशोक मोरे आदिसह ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

Exit mobile version