जे.एस.एम कॉलेजच्या संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून ॲड. गौतम पाटील यांची बिनविरोध निवड

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जनता शिक्षण मंडळ ( जे.एस.एम ) च्या सन 2021-2026 या पंचवार्षिक कालावधी करीता निवडणूक पार पडली. जे.एस.एमच्या संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड गौतम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून डॉ साक्षी गौतम पाटील यांची तर कार्यवाह म्हणून गौरव प्रमोद पाटील यांची बिनविरोध झाली. ज्येष्ठ संचालक म्हणून संजय पाटील , अजित शाह , शारदा धुळप व रघुजीराजे आंग्रे हे बिनविरोध निवडून आले . नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ साक्षी गौतम पाटील यांनी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले.

Exit mobile version