असंघटित कामगारानी नोंदणी करणे गरजेचे

तहसीलदार विजय तळेकर याचे प्रतिपादन
| पनवेल । वार्ताहर ।

केंद्र शासनाच्या ई-श्रम योजनेंअंतर्गत असंघटित कामगारांची जास्तीत जास्त कामगारांची ऑनलाईन नोंदणी केली जावी याकरिता 30 नोव्हेंबर तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे बैठक घेण्यात आली. ही बैठक विजय तळेकर, तहसिलदार पनवेल, सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी, गटविकास अधिकारी संजय भोये, तसेच महापिालका प्रभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

स्वयं रोजगार, घरेलू कामगार, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारे कामगार, फळ व भाजीपाला विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, विडी कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, मुक्त पत्रकार, फेरीवाले व इतर सुमारे 300 उद्योग व्यवसायातील कामगार तसेच संघटित क्षेत्रातील इतर कामगार ज्यांना कामगार कायद्याचे संरक्षण नाही असे कामगार नोंदणी करू शकतात. ई-श्रम अंतर्गत सदर नोंदणी पुर्णपणे नि:शुल्क आहे. ही नोंदणी अर्जदार स्वतः नागरी सुविधा केंद्रामार्फ़त करु शकतो.

तसेच ई- श्रम पोर्टल URL eshram.gov.in या अधिकृत वेबसाईवरती जाऊन नोंदणी करता येऊ शकते. या नोंदणी करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. कामगाराची नोंदणी प्रकिया पुर्ण झाल्यावर कामगारांस नागरी सुविधा केंद्रातील प्रतिनिधीकडून ए-4 आकाराच्या पेपरवर ण-छ कार्ड काढून देण्यात येईल. अधिक माहिसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नं.-14434, टोल फ्री नं.-18001374150 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त कामगारांनी ई-श्रम योजने अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version