| उरण | वार्ताहर |
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड ची नोंदणी व नॅशनल पेन्शन योजनेसाठी नोंदणी शिबीर शनिवारी ( 24 सप्टेंबर) सकाळी 9.30 ते 5.30 या कालावधीत कॉमन सर्विस सेंटर कोप्रोली येथे मोफत आयोजित करण्यात आले आहे. नोंदणी साठी येताना नागरिकांनी ओरिजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व कोणताही चालू मोबाईल नंबर घेऊन स्वतः व्यक्ती येणे आवश्यक आहे. आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसला तरी चालेल. घर कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, फेरीवाला, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, दुकानदार, खाजगी सेवक, इतर असंघटित कामगार यांच्यासाठी या योजना असून शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा भविष्यात लाभ मिळणार आहे. अधिक माहितीसाठी कॉमन सर्विस सेंटर, (उडउ) आधार सेंटर, युनियन बँके जवळ, कोप्रोली-उरण. फोन नंबर 9004763339 येथे संपर्क साधावा.