| चिरनेर | वार्ताहर |
उरण शहराला जोडणार्या मार्गाचे सिडकोकडून रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याला नव्याने पदपथ बांधले आहेत. या रुंदीकरण झालेल्या रस्त्याच्या पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा करून ताबा घेतला आहे. त्यामुळे प्रवेश करणारे नागरिक येथील रस्त्याचाच वापर करीत असल्याने या मार्गावर वाहनांची कोंडी होऊ लागल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उरण नगरपरिषद व ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील वादामुळे अनेक वर्ष उरण चार फाटा ते नगरपरिषद हद्द यामध्ये रस्ता खड्डे व कोंडी या समस्याना सामोरे जावे लागत होत. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोच्या माध्यमातून उरण चार फाट्याच्या विकासाचे काम हाती घेऊन या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण करून ही समस्या दूर न होता या मार्गावरील कोंडीत अधिक वाढ झाली आहे त्यामुळे पदपथ मोकळे करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.