अवकाळीचा आंबा-काजूला फटका

फळ पिकावर किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यात अवकाळीमुळे आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडी तसेच काजू पिकावर काजूवरील ढेकण्याआणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तरी आंबा व काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करून निगराणी करावी असे आव्हान माणगाव तालुका कृषी अधिकारी अजय वगरे यांनी केले आहे.

तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (10 तुडतुडे प्रति पालवी / मोहोर) ओलांडली असल्यास व ज्याठीकाणी पिक पालवी अवस्थेत असेल अशा ठीकाणी डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 09 मि.ली. प्रती 10 लिटर पाणी, पिक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मि.ली. प्रती 10 लिटर पाणी व पिक मोहोर अवस्थेत असल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही 3 मि.ली. किंवा ब्युप्रोफेझिन 25 टक्के प्रवाही 20 मिली प्रती 10 लिटर पाणी तसेच जर फळे वाटाण्याच्या आकाराची अथवा त्याहून मोठी असल्यास थायोमेथॉक्झाम 25 टक्के 1 ग्रॅम प्रति 10 लीटर पाणी याप्रमाणात वापरावे. फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सदर कीडींच्या व्यवस्थापनाकरीता स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही 2.5 मिली किंवा थायोमेथॉक्झाम 25 टक्के 2 ग्रॅम प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच काजूमध्ये ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पालवी, मोहोर व फळधारणा झाली असल्यास त्याची पाहणी करावी. सदर किडींचा प्रादुर्भाव आढून आल्यास दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 10 मि.ली. यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

Exit mobile version