| धाटाव | प्रतिनिधी |
रोह्यात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार शिडकाव्यासह गडगडाट करून हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी या अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतीतील पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
विशेषतः आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाची व्यावसायिकांमध्ये सुद्धा पावसामुळे भीती निर्माण झाली होती. काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. तर दुपार पासूनच सायंकाळी उशिरा पर्यंत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे ठिकठिकाणी सुरू असलेल्या हनुमान जयंती उत्साहात उभारलेले मंडप भिजणार या भीतीमुळे डेकोरेटर्स व्यावसायिकांनी मात्र चांगलाच धसका घेतला होता.
रोह्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने लावली हजेरी
