चॅम्पियन्सच्या स्वप्नांवर अवकाळीचं पाणी

। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकात चॅम्पियन्स श्रीलंकेच्या संघाला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. विश्‍वचषकाचा 23वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता. पण फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर दोघांमधील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाला नेपाळविरुद्ध विजयाची नितांत गरज होती. पण पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे चॅम्पियन्स संघ टी-20 विश्‍वचषकामधून बाहेर गेला आहे. आता त्याचे सुपर-8चे भवितव्य जर-तर या समीकरणात अडकले आहे. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. या रद्द झालेल्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका सुपर-8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. श्रीलंकेला आता बांगलादेश आणि नेदरलँड्सविरुद्ध अधिक खेळायचे आहे. सुपर-8 गाठायचे असेल तर हे दोन्ही सामने जिंकावे लागतील. श्रीलंकेा यापैकी एकही सामना हरली तर ती बाहेर पडू शकते.

Exit mobile version